महाराष्ट्रातील सत्ता भाजपच्या हातून गेल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत देखील भाजपचा पराभव झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत तीनही जागेंवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालानंतर तृणमूलच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका करत भाजपाला त्यांच्या उद्धटपणाची किंमत चुकवावी लागली आहे हा जनतेचा विजय असून . हा विकासाचा विजय आहे. उद्धटपणाच राजकारण येथे चालणार नाही,असं ममता यांनी म्हटलं आहे. दरम्यान दोन वर्षानंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे भाजपानं पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रीत केलं आहे.