‘नीती’ आयोगाच्या पुर्नरचनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिल्यानंतर १५ जूनला नीती आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण या बैठकीच्या आयोगाकडे कोणतीही आर्थिक ताकद नसून राज्यांनी तयार केलेल्या योजनांचे समर्थन करण्याची क्षमताही या बैठकीत नाही त्यामुळे या बैठकीला हजेरी लावणे व्यर्थ आहे असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले.