ममतादीदींचा नवा अंदाज, शेरो-शायरी करत केली भाजपवर टीका

Update: 2019-06-05 09:34 GMT

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचा एक नवा अंदाज आज पहायला मिळाला. कोलकातामध्ये रमजान ईदच्या निमित्तानं ममता यांनी मुस्लीम बांधवांना संबोधित केलं. आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ममतादीदींनी यावेळी शेरो-शायरी करत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. ‘हमसें जो टकराएगा, वो चूरचूर हो जाएगा’, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता हैं, वही होता हैं जो मंजूर-ए-खुदा होता है’ हा शेरही त्यांनी सादर केला. यावेळी ममता यांनी लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिनवरही पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ईव्हीएमविरोधात आंदोलनासाठी तयार रहाण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. यासोबत बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच मतदान घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला. ईव्हीएमचा वापर करुन जेवढ्या झपाट्याने ते आले आहेत, तेवढ्याच झपाट्याने निघूनही जातील असं ममतांनी म्हटलंय.

Similar News