महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता आदेश दिला गेला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार उद्या बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर गुप्त मतदान न करता विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रीकरण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. दरम्यान सोनिया गांधी यांनी बहुमत आम्हीच जिंकू असा विश्वास दिला आहे.