मुंबई मराठी पत्रकार संघाचा महत्वाचा पुरस्कार मनश्री पाठकला जाहीर

Update: 2020-01-04 08:40 GMT

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणार्‍या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदा या पुरस्कारासाठी एबीपी माझाची प्रतिनिधी मनश्री पाठकला जाहीर झाला आहे. मुंबईतील नागरी समस्यांवरील उत्कृष्ट वृत्तंकनासाठी मनश्री पाठक हिला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणूकीनंतर महिनाभर सुरू असलेल्या सत्तानाट्याबाबत सामान्य प्रेक्षकांना वृत्तवाहिन्यांसमोर खिळवून ठेवणाऱ्या एबीपी माझाच्या वैभव परब आणि मनश्री पाठक यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे यंदाचे मानाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर एबीपी माझाच्याच मनश्री पाठक यांना मुंबईतील नागरी समस्यांवरील वृत्तांकनासाठी आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या पुरस्कारासाठी दै. पुढारीचे रवींद्र भोजने, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम खाडीलकर, जय महाराष्ट्र वाहिनीच्या सुषमा परतवाघ, ज्येष्ठ पत्रकार शिरीष पै आणि इंडियन एक्सप्रेस समूहाच्या शुभांगी खापरे यांची निवड झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट बातम्यांसाठी असलेला विश्वनाथराव वाबळे स्मृती पुरस्कार दै. सकाळच्या तेजस वाघमारे यांनी पटकावला आहे. हा पुरस्कार ६ जानेवारी सोमवारी सायंकाळी ५ वाजता खासदार आणि दै. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या हस्ते पत्रकार भवनात पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Similar News