माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. राजकीय वर्तुळात यावरून ट्विटवॉर सुरु आहे. आता यामध्ये 'बाई जरा दमानं घ्या', असा मनसेचा खोचक टोला मनसेच्या पुण्यातील नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांना दिला आहे.रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमधून अमृता फडणवीस यांच्यावर टीका केलीय. 'ठाकरे नाव लावून ठाकरे होता येत नाही हे बोलणाऱ्या डोक्यावर पडल्या आहेत', असा खोचक टोला ठोंबरे यांनी लगावला आहे. मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता जरा भानावर या, असंही ठोंबरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
https://www.facebook.com/rupalipatilthombare/posts/3542895319084140