मी इतकी महत्वाची व्यक्ती नाही की ते (मुख्यंत्री) माझं ऐकतील- रेणुका शहाणे

Update: 2019-08-09 07:45 GMT

कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली आहे.अनेक लोकांना या पूराचा फटका बसला असून अनेकजण बेघर झाले आहेत.आजही महापुराचे पाणी वाढत असल्यामुळे नागरिकांचे स्थलांतर सुरू होते. दरम्यान रेणूका शहाणे यांनी ट्विटवरुन काळजी व्यक्त करत पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले आहे. मात्र यावेळी त्यांनी सरकारचे धोरण बिल्डर धार्जिणी असल्याचा टोला फडणवीस सरकारला लगावला आहे. या ट्विटमध्ये

“कोणी मला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीची लिंक देऊ शकेल का? कल्याण, ठाणे, नाशिक, सातारा, सांगली, कराड आणि कोल्हापूरमधील लाखो नागरिकांना पूराचा फटका बसला आहे. त्यांना आपली गरज आहे”

असं शहाणे यांनी ट्विटमध्ये म्हटलंआहे. दरम्यान या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

https://twitter.com/renukash/status/1159649778222825472?s=20

https://twitter.com/renukash/status/1159662529645170688?s=20

Similar News