२०१८ मध्ये मिस डेफ आशियाचे विजेतेपद मिळविणारी निष्ठा डुडेजा ही पहिली भारतीय महिला ठरली. याआधी तिने २०१५ मधील वर्ल्ड डेफ टेनिस स्पर्धेत आणि डेफ ऑलिम्पिकमध्येही देखील भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मीठीबाई कॉलेज मध्ये इकोनॉमिक्स विभागात ती शिक्षण घेत आहे.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सी एस आर रिसर्च फाउंडेशन तर्फे एका सेमिनारमध्ये हा सम्मान दिला. लहानापासून तिला बोलता येत नव्हतं, मात्र तिच्या वडिलांनी कधीही कमीपणा घेतलं नाही. ती सामान्य शाळेत शिकून तिने बैडमिंटनमध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली. ती आता मुंबईमध्ये एक्टिंग आणि मॉडलिंग मध्ये करियर करत असून आशियाबरोबर विश्व सुंदरीचा किताब देखील आपल्या नावावर करण्याची तयारी करत आहे.