CoronaVirus : राज्यात २५६० नवीन रुग्ण, एकुण ३९९३५ रुग्णांवर उपचार सुरु

Update: 2020-06-04 01:53 GMT

राज्यात काल ९९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३६ खाजगी अशा एकूण ८२ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ९७ हजार २७६ नमुन्यांपैकी ७४ हजार ८६० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७१ हजार ९१२ खाटा उपलब्ध असून सध्या ३३ हजार ६७४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दि. १ मे ते १ जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून दि.१ जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा ( ४.७४ टक्के ) देखील कमी झालेला आहे, हे स्पष्ट झाले. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते आहे.

राज्यात १२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ६० (मुंबई ४९, उल्हासनगर ३, ठाणे २, नवी मुंबई ३, वसई विरार १, भिवंडी १, मीरा भाईंदर- १), नाशिक- ८ ( धुळे ४, जळगाव २, अहमदनगर १, नंदूरबार १), पुणे- २९ (पुणे १९, सोलापूर १०), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २) औरंगाबाद-१७ (औरंगाबाद मनपा १६, जालना १), लातूर- १ (उस्मानाबाद १), अकोला-२ (अकोला २), इतर राज्ये-३ (उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.)

काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ५१ महिला आहेत. काल नोंद झालेल्या १२२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६९ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या १२२ रुग्णांपैकी ८८ जणांमध्ये (७२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५८७ झाली आहे.

काल नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते ३१ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई ३०,सोलापूर -१०, औरंगाबाद -६, नवी मुंबई -३, धुळे -३, जळगाव -२, कोल्हापूर -२, ठाणे २, अहमदनगर -१, अकोला १, नंदूरबार -१,पुणे १ , उल्हासनगर १, वसई विरार -१ आणि उत्तर प्रदेशमधील १ असे आहेत .

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधीत रुग्ण- (४३,४९२), बरे झालेले रुग्ण- (१७,४७२), मृत्यू- (१४१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४,५९७)

ठाणे: बाधीत रुग्ण- (१०,८६५), बरे झालेले रुग्ण- (३९९२), मृत्यू- (२४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६३३)

पालघर: बाधीत रुग्ण- (११९९), बरे झालेले रुग्ण- (४४७), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१८)

रायगड: बाधीत रुग्ण- (१२३८), बरे झालेले रुग्ण- (६४५), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४०)

नाशिक: बाधीत रुग्ण- (१२३५), बरे झालेले रुग्ण- (९४२), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२५)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१६५), बरे झालेले रुग्ण- (६२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५)

धुळे: बाधीत रुग्ण- (१७७), बरे झालेले रुग्ण- (९४), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३)

जळगाव: बाधीत रुग्ण- (७८१), बरे झालेले रुग्ण- (३३०), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७७)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (३७), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५)

पुणे: बाधीत रुग्ण- (८४६३), बरे झालेले रुग्ण- (४५८५), मृत्यू- (३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५११)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (१०३२), बरे झालेले रुग्ण- (४४८), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९९)

सातारा: बाधीत रुग्ण- (५६४), बरे झालेले रुग्ण- (२०६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३६)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (६०७), बरे झालेले रुग्ण- (२१३), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८८)

सांगली: बाधीत रुग्ण- (१२६), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०)

रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३१४), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९१)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१६५३), बरे झालेले रुग्ण- (१०९५), मृत्यू- (८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७४)

जालना: बाधीत रुग्ण- (१५४), बरे झालेले रुग्ण- (५९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७)

परभणी: बाधीत रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)

लातूर: बाधीत रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)

बीड: बाधीत रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)

नांदेड: बाधीत रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०)

अकोला: बाधीत रुग्ण- (६४७), बरे झालेले रुग्ण- (३५८), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५५)

अमरावती: बाधीत रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९७)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१४८), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (७४), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)

वाशिम: बाधीत रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)

नागपूर: बाधीत रुग्ण- (६३५), बरे झालेले रुग्ण- (३९२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३२)

वर्धा: बाधीत रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६)

भंडारा: बाधीत रुग्ण- (३७), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८)

चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (२७), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५)

एकूण: बाधीत रुग्ण-(७४,८६०), बरे झालेले रुग्ण- (३२,३२९), मृत्यू- (२५८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(३९,९३५)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३६२ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३६६१ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ९५० सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७१.४८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Similar News