‘राज ठाकरे म्हणजे फक्त एंटरटेनमेंट’- अमृता फडणवीस

Update: 2019-10-14 10:34 GMT

मनसे आणि भाजप हे एकमेकांवर राजकीय टीका करण्याची संधी कधीच सोडत नाही. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही मागे राहील्या नाहीत.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस चक्क मुख्यमंत्र्यांसमोर मनसेचा प्रचार करत असल्याचा एक व्हिडीओ व्हारयरल झाला होता. तो फेक असल्याचं निष्पन्न झालयं.

त्यानंतर आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रॅपिड फायर राऊंडमध्ये अमृता फडणवीस यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये, राज ठाकरेंबद्दल एका वाक्यात काय सांगाल असे विचारले असता यावर, “त्यांना हे वाईट वाटेल, पण विचारलंय म्हणून सांगते... एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट...” असे गोड़ बोलत त्यांनी राज यांची खिल्ली उडवली आहे.

Similar News