विदर्भातील एकमेव महिला आमदार व काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी आज आपल्या अमरावती जिल्ह्यातील मूळ गावी मोझरी येथे सह कुटुंब सकाळी मतदानाचा अधिकार बजावला आहे.
यशोमती ठाकूर ह्या तिवसा मतदार संघात निवडणूक रिंगणात असून सलग दोनदा त्या विजयी झाल्या आहेत तर आता त्यांची तिसरी टर्म आहे.
आज यशोमती ठाकूर यांनी आपल्या कुटुंबासह मोझरी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावला मुलगी आकांशा आई व काकासह मतदान केले.