आज राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी आणि सातारा लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकीसाठी मतदान होत आहे.
साताऱ्यातील पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आपल्या कुटुंबीयांसह अनंत इंग्लिश स्कुल मध्ये जाऊन मतदान केले आहे. त्याचबरोबर लवकर मतदान करुन दिवसभर आमदारकीच्या मतदानाचा आढावा घेणार असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हंटल आहे.
courtesy : social media
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष मिळून एकूण मतदारांचा विचार केला तर पुरुष उमेदवार 3 हजार 237 आहे. तर दुसरीकडे 235 महिला उमेदवार निवडणूकीच्या मैदानात आहेत. त्याचबरोबर एक तृतीय पंथी निवडणुकीच्या मैदानात आहेत.
एकूण 8 कोटी 97 लाख 22 हजार 19 मतदारांसाठी राज्यात एकूण 96,661 मतदानकेंद्रं उभारण्यात आली आहेत, तर 1,35,021 VVPAT मशीन देखील बसवण्यात आली आहेत.