मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. तो हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. अनेक दिग्गज नेते आणि कलाकारांनी मतदान केल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. सोबतच तृतीय पंथीयांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
आज राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी आणि सातारा लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकीसाठी मतदान होत आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष मिळून एकूण मतदारांचा विचार केला तर पुरुष उमेदवार 3 हजार 237 आहे. तर दुसरीकडे 235 महिला उमेदवार निवडणूकीच्या मैदानात आहेत. त्याचबरोबर एक तृतीय पंथी निवडणुकीच्या मैदानात आहेत.