ठाण्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेनंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना “भाजपला फक्त निवडणूक आली की, भारतरत्न आठवतो का? आमची गेली अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की फुले दाम्पत्य, सावरकर यांना भारतरत्न मिळावा.” भाजप सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली.
“दरम्यान, भाजपने आताच्या संकल्पपत्रात केलेल्या घोषणा 2014 च्या जाहीरनाम्यात देखील केल्या होत्या. म्हणजे संकल्पपत्र म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस आहे, त्यांनी 5 वर्ष काय झोपा काढल्या का?” असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.