आली आली सत्यभामा आली...

Update: 2019-10-05 13:31 GMT

समाजकार्यांतून सतत चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल याही आता विधानसभा निवडणूक 2019 लढवणार आहेत.

कोणत्याही पक्षात न जाता समाजकार्याच्या जोरावर माजलगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी मिळवून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय त्यांनी काल उमेदवारीचा अर्जही दाखल केला आहे.

तसेच त्या म्हणाल्या की, “माझ्याकडे पैसा आणि पक्ष दोन्ही नाही, मी माझ्या समाजकार्याच्या आधारावर निवडणूक लढवणार आहे आणि मला आमदार होता आलं नाही तरी एक महिला म्हणून मी राजकीय वाटचालीत सक्रिय होणार आहे. यासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे.”

 

Similar News