धनंजय मुंडे यांच्या कथित व्हिडीओ क्लीपने परळी विधानसभेसह महाराष्ट्राच्या राजकारणात वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओ क्लीपवरुन धनंजय मुंडे यांच्या विरूध्द कलम 500, 509, 294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे.
त्यानंतर सकाळी धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.
“व्हिडीओ एडीट करणाऱ्यांनी किमान बहीण भावाच्या नात्यात असं विष कालवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे फारच खालच्या पातळीचं राजकारणं केलं जात आहे.”
असं म्हणत ही क्लीप खोटी असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
“विचारांच्या मुद्द्यात मला हरवता येत नाही म्हणुन भावनांचं राजकारण करुन मला संपवण्याचा कट केला जातोय. भाजप ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर न लढवता भावनांच्या मुद्द्यांवर लढवत आहे. मोदी, शाह आणि उदयनराजेंना आणुनही काही होत नाही म्हणुन आता बहीण भावाच्या नात्याला बदनाम का करावं?”
असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
या सर्व प्रकरणावर पत्रकारांशी बोलताना प्रितम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
“पंकजा मुंडेंनी बीडच्या विकासासाठी काम केलं ही त्यांची चूक झाली का? ऐकवत नाही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्याविषयी बोललं गेलं. आतापर्यंत जेव्हा जेव्हा पंकजा मुंडे यांच्याविरोधात कारस्थान झालं, तेव्हा तेव्हा त्या खंबीरपणे त्याला सामोऱ्या गेल्या. त्या कधीही खचल्या नाही. काहीही केलं तरी त्या खचत कसं नाही हीच त्यांची पोटदुखी आहे. इतक्या खालच्या पातळीवरील टीका ऐकूनही ती खचली नाही, मात्र, ती उद्विग्न झाली आहे. मी तिला इतकं उद्वीग्न झालेलं मी आतापर्यंत कधी पाहिलं नाही.”
गोपीनाथ मुंडे आज असते, तर असं बोलण्याची कुणाची हिंमत झाली नसती, स्वतःचा रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल असं म्हणत प्रितम यांनी ‘पंकजा मुंडेंचं राजकारणातून बाहेर जाणं बीडला परवडणारं नाही’ येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं यामुळे मोठं नुकसान होईल असं मत प्रितम मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.
तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी...
तर मी लढलो नसतो...
ज्या बहिणीसाठी 2009 मध्ये हा परळीचा मतदारसंघ सोडला, त्यांच्याकडूनच जर अशी बदनामी होत असेल आणि निवडणूक जिंकण्यासाठी हे होत असेल, तर असं राजकारणही नको आणि जीवनही नको.” जर निवडूनच यायचं होतं तर एका शब्दाने जरी म्हटलं असतं तर निवडणूक लढलो नसतो. फार वेदना झाल्या; मला जग सोडून जावंस वाटत होतं. असं म्हणत या सर्व प्रकरणावर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.