आज राज्यात विधानसभेच्या २८८ जागांवर आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान होत आहे. परळी मतदार संघातील भाजपच्या उमेदवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटूंबीयांसह जिल्हा परिषद शाळेतील मतदार केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.
तसचं त्यांनी ट्विटर पोस्टवर म्हटलं आहे की, “सर्व सुसंस्कृत, सुशिक्षित आणि संवेदनशील मतदारांनो, मी आपल्याला विनम्र आवाहन करते की, सशक्त लोकशाहीसाठी आपण घराबाहेर पडून मतदान करा.”
सहकुटुंब नाथरा येथे जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. सर्व सुसंस्कृत, सुशिक्षित आणि संवेदनशील मतदारांनो, मी आपल्याला विनम्र आवाहन करते कि सशक्त लोकशाहीसाठी आपण घराबाहेर पडून मतदान करा. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/nzKVFttmg2
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 21, 2019