जालना जिल्ह्यात एकूण पाच मतदार संघ आहेत. मात्र, या पाच मतदार संघापैकी परतूर मतदार संघातून फक्त एका महिलेने उमेदवारी दाखल केली आहे. जालन्यातील एकेकाळी नावाजलेली मोठी कंपनी झलानी टूल्स पूर्वीची गेडोर कंपनीतील कामगार ऱाधेश्याम शर्मा यांची मुलगी सरीता शर्मा खंदारे यांनी माकप मधून उमेदवारी दाखल केली आहे.
जालना जिल्ह्यातील या एकमेव महिला उमेदवार असल्यानं सगळ्यांचं लक्ष त्यांच्या प्रचाराकडे आहे. परतूर मतदार संघात एकून २३२ गावं आहेत. त्यापैकी सरीता शर्मा खंदारे यांनी १४० पेक्षा अधिक गावांमध्ये जाऊन भेट दिली आहे. विशेष म्हणजे महिलांशी संपर्क साधला आहे. इतर नेत्यांसारखा थाट-माट न करता, प्रचारादरम्यान त्या रोजगार हमीची कामे तसेच शेतात जाऊन निवडून देण्याचं आवाहन करत आहेत.