गेल्या काही दिवसापासून रुपाली चाकणकर नाराज आहेत. अशा बातम्या विविध माध्यमातून झळकल्या होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याकडे (ncp)राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्ष पद आले.
त्यानंतर विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या. मात्र, खडकवासला या विधानसभा मतदार संघातून विधानसभेची तयारी करत असलेल्या रुपाली चाकणकर यांचा पत्ता कट करण्यात आला असा एक संदेश सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. या संदर्भात मॅक्सवूमनच्या टीमने रुपाली चाकणकर यांच्याशी बातचित केली.
यावेळी त्यांनी ‘मला पूर्ण राज्याची जबाबदारी असताना आपणच स्वत: उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे आपल्या उमेदवारीचा बळी दिला. असं मी स्वतःला समजत नाही’ असं म्हणत त्यांनी या सर्व प्रकरणावर आपली बाजू मांडली.
जर आपण राजकारणाकडे पाहिले तर कुठल्याही महिलेला राजकारणात यायचं असेल तर इतर क्षेत्रापेक्षा राजकारणात तिला तितकासा सहज प्रवेश करता येत नाही.
प्रवेश केला तरी तिथे टिकुन राहणं तितकस सोपं नसतं. नवीन पिढी येत आहे. त्यामुळे दृष्टीकोन जरा बदलतोय. महिला केवळ सोशीक आहेत. ही विचारसरणी पुसणे आवश्यक आहे. त्यांनाही विचार करण्याची क्षमता आहे. हा विचार पुढे यायला हवा. असं त्यांनी मॅक्सवुमन शी बोलताना सांगितले.
गेल्या काही दिवसापासून रुपाली चाकणकर नाराज आहेत. अशा बातम्या विविध माध्यमातून झळकल्या होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्ष पद आले.