कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी (MLA Medha Kulkarni) यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील १७ ब्राह्मण संस्थांनी भाजपचे कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रहिताची भूमिका घेऊन काम करणाऱ्या भाजपासोबत राहण्याचे आवाहन आमदार मेधा कुलकर्णी यांनी संस्थाचालकांना केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत ब्राह्मण संस्थांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा त्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत सरकार सकारत्मक प्रयत्न करेल असे आश्वासन देखील पाटील यांनी दिले आहे.