केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी या रोहिणी खडसे यांच्या प्रचारासाठी मुक्ताईनगरमध्ये आल्या होत्या. यावेळी एकनाथ खडसेंनी हिंदीतून भाषणास सुरुवात केल्यानंतर स्मृती इराणीं यांनी खडसेंना मराठीतून बोलण्याची विनंती केली.
यावर खडसेंनी “मला हिंदीतून भाषण करायला आवडते. मी हिंदी विसरु नये म्हणून कधी कधी हिंदीतून भाषण करतो. माझीही संसदेत यायची मनापासून इच्छा होती.” असं उत्तर देत सभेत हशा पिकवला मात्र, मनातील सुप्त इच्छाही व्यक्त केली आहे.