ठाकरे सरकारच्या बजेटमधून महिलांना काय मिळालं?

Update: 2020-03-06 09:53 GMT

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात शेती, जलसिंचनावर भर देण्यात आलाय, मात्र यावेळी पर्यटनावरही विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी सरकारने अधिक जोर दिला असून या अर्थसंकल्पात महिलांच्या हाती काय लागलयं पाहुयात..

 

  • महिला बालविकास विभागासाठी 2 हजार 110 कोटी
  • प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलिस ठाणे, महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध
  • फक्त महिलाच अधिकारी, कर्मचारी असलेले महिला पोलीस ठाणे प्रत्येक जिल्हा मुख्यालयात स्थापन करण्यात येणार, जिल्ह्यातील पीडित महिला येथे निर्भयपणे तक्रार दाखल करू शकतील.
  • महिला बचत गटाच्या चळवळी सुरु करुणार
  • किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन उपब्लध करून देण्यात येईल

Similar News