मुंबई बेस्ट बसने काही दिवसांपूर्वीच बेस्ट बसमध्ये महिलांची भरती सुरु केली असून त्यापाठोपाठ आता राज्यातील एसटी महामंडळातही महिला चालकांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता बेस्ट बस आणि एसटीमध्ये महिला चालकांसाठीही संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत आदिवासी महिलांसाठी एसटी महामंडळाने विशेष योजना सुरु केल्या आहेत. यामध्ये चालक-वाहक म्हणून 150 महिलांची निवड केली आहे. राज्यातील मुलींसाठी ‘वाहन चालक प्रशिक्षण योजना’ सुरु करून 21 आदिवासी मुलींनी प्रशिक्षण घेतलं आहे.