21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसंदर्भात अधिका अधिक मतदारांनी जागृत होऊन सहभाग घ्यावा. यासाठी मतदार जन जागृतीचा व्यापक कार्यक्रम राबवण्यात येत आहे. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधूरी दीक्षित या मोहीमेचा भाग असणार आहे. माधूरी दीक्षित यांच्यामार्फत 'चला मतदान करूया' ही मोहीम व्हिडीओ स्वरूपात राबवण्यात येणार आहे.
या व्हिडीओव्दारे माधुरी लोकशाही प्रक्रिया, तसंच देशाच्या विकासात जागरूक मतदारांच्या भूमिकेचे महत्त्व समजावून सांगत आहेत. मतदार जागृतीच्या मोहिमेला कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची 'सदिच्छादूत' म्हणून साथ मिळाली आहे.