"क्या करे साब मजबूरी है, अब लकडीही जलानी पडेगी"
ग्रामीण भागातील महिलांना धुर मुक्त करण्याच्या पंतप्रधानांच्या दाव्याचाच धुर झाला आहे. सततच्या गॅस दरवाढीमुळे ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा धुराचा सामना करावा लागतोय.
ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅसचे दर वाढत असल्याने ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा चुलीला पसंती दिली आहे.
या संदर्भात बोलताना गृहिणी अश्मा शेख म्हणाल्या की, "पंतप्रधान मोदी म्हणाले होते गॅस स्वस्त करु पण आता 400 रुपयांचा गॅस 800 रुपयांना मिळतोय. काय करणार साहेब शेवटी मजबुरी असल्याने आता पुन्हा चूल पेटवावी लागतेय."
या सततच्या इंधन दरवाढीमुळे बंद झालेल्या लाकडाच्या वखारी पुन्हा सुरु झाल्या आहेत. पाहा या विषयी मॅक्स वुमनचे करस्पाँडन्ट मोसीन शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट...