2019च्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकात भाजपा विरुद्ध महाआघाडी अशी लढत झाली आहे. कुणाची सत्ता येणार हे आज स्पष्ट होणार आहे. सात टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये केंद्रात पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळून मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला... त्यामुळे आता ईव्हीएममधील कल कोणाच्या बाजूने लागतील, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तसेच महाराष्ट्रातून चारुलता टोकस, भावना गवळी, रक्षा खडसे, नवनीत राणा, कांचन कुल, सुप्रिया सुळे, वैशाली येडे, उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त पूनम महाजन, प्रीतम मुंडे, हिना गावित या महिला उमेदवार आहेत.