आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष मोठी-मोठी आश्वासनं देत आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे पोकळ आश्वासन यंदाच्या सरकारनं दिलं आणि त्याचा गोंधळही आपण सर्वांनी पाहिला मात्र आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असं आश्वासन करत 2009 ला जशी कर्जमाफी केली तशी करु असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच आज सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेत हे आश्वासन देत भाजप, मोदी आणि फडणवीस सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. पाहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे..