काटेकोर नियमांसह दारुविक्री सुरु होणार?

Update: 2020-04-21 04:45 GMT

लॉकडाऊन (Lockdown) काळात कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या 'ग्रीन आणि ऑरेंज झोन' मधील निवडक उद्योगांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केलंय.

२० एप्रिल रोजी राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांना लॉकडाऊन दरम्यान मद्याविक्रीबाबत प्रश्न विचारण्यात आला. जर 'सोशल डिस्टन्सिंग'चं काटेकोर पालन होणार असेल तर मद्याविक्रीला हरकत नसावी, असं टोपे यांनी या प्रश्नाला उत्तर देतांना म्हटलं होतं.

यासंदर्भात काटेकोर नियमावली करून अंतिम निर्णय घेतला जाईल असं ट्विट राजेश टोपे यांनी केलंय.

Similar News