स्त्रीयांचे सौंदर्य वाढवणारी गोष्ट कोणती?... तर तिचे केस. स्त्रीचे सौंदर्य तिच्या केसात असते. केसांच्या वळणामुळे आणि ठेवणीमुळे स्त्रियांचे व्यक्तीमत्त्व अधिक प्रभावी दिसते. नेमकी हीच गोष्ट नसेल तर आजुबाजूला वावरणाऱ्या लोकांच्या मनाला ते पटत नाही. या सर्व गोष्टींचा विचार न करता. पत्रकारीतेचे शिक्षण घेत असणाऱ्या किरण गिते या मुलीने कर्करोग पिडीतांना ‘हेअर डोनेट’ केले आहे.
आपण कसे दिसु याचा विचार न करता. तरूण वयातचं तिनं आपल्या केसांचे दान केलं आहे. तिच्या या कामगिरीमुळे सर्वच स्तरावरून तीचं कौतुक होत आहे.