उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची लहान बहिण किम यो जोंगने अचानक म्हणजेच तब्बल दोन महिन्यांनंतर सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. तब्बल दीड लाख आसनक्षमतेच्या मे डे स्टेडियममध्ये भाऊ किम जोंग उनसह यो जोंग नजरेस पडली. वॉशिंग्टनसोबत परमाणु शिखर वार्ता अपयशी ठरल्यानंतर यो जोंग सार्वजनिक कार्यक्रमातून बाहेर पडल्याचे बोलले जात होते.
https://twitter.com/AP/status/1135740043367211013