18 वर्षाची खदीजा मेल्लाह हिजाब परिधान करून स्पर्धात्मक घोड्यांच्या शर्यतीत भाग घेणारी यूकेमधील पहिली व्यक्ती आहे. हिजाब परिधान करून हॉर्स रेसिंग करणारी खादीजा मेल्लाह पहिली हॉर्स रायडर बनली. याआधी तिने ऑल-फीमेल मैगनोलिया कप चैरिटी रेसमध्ये भाग घेतलं होतं. खादीजाच्या या निर्णयामुळे मुस्लिम महिलांची विचार करण्याची धारणा बदलेल. लंडनच्या द डेली टेलीग्राफ या वृत्तपत्राजवळ बोलताना ती बोलली "आमच्या कुटुंबामध्ये आम्ही आमचे स्वप्न पाहू शकत नाही अशी धारणा असते आम्ह्यला आमच्या घरचे सांगतात ते करावं लागतं जे चुकीचं आहे.
मी लहानापासून हे स्वप्न पाहत होती की मी असं काही करेन ज्यामुळे लोकं मला ओळखतील. आता मुस्लिम मुली देखील माझ्याकडे बघून काहीतरी करण्याची उम्मीद निर्माण होईल. मला अनेक मुस्लिम मुलींचे संदेश येत आहेत जे वाचून मला आनंद होतो. माझ्यामुळे त्यांना प्रेरणा मिळते हे बघून मी एक चांगला निर्णय घेतला आहे असं मला वाटतं " तिने ग्लोरियस गुडवुड येथे मॅग्नोलिया चषक जिंकून एक इतिहास रचला आहे.