हृतिक आणि कंगनातील कथित अफेअर प्रकरणानंतर पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. मणिकर्णिका कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यातील प्रकरण मिटायचे नाव घेत नाही. आता कंगनाचा ‘मेंटल है क्या’ आणि आणि ऋतिक रोशनचा ‘सुपर ३०’ एकाच दिवशी म्हणजेच २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे. ऋतिकचा ‘सुपर ३०’ आधी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पंरतू ‘सुपर ३०’ चे निर्माते अडचणीत आले होते. त्यांनी आपल्या चित्रपटाचे काम अद्याप अपूर्ण असल्याचे सांगत प्रदर्शनाची तारीख २६ जुलै केली आहे.
तर मेंटल है क्या’ हा चित्रपट २९ मार्च, २०१९ ला प्रदर्शित होणार होता नंतर ही तारीख २१ जून करण्यात आली होती. परंतु, कंगनाने याच तारखेला आपला चित्रपट ‘मणिकर्णिका’ची घोषणा केली. ७ मे ला बालाजी मोशन पिक्चर्सने आपल्या ट्विट अकाऊंटवरून अधिकृतरित्या ट्वीट केले होते की, चित्रपटाची नवी तारीख आणि बॉक्स ऑफिस क्लॅश होण्या्विषयी लिहिले होते. मेंटल है क्या’ विषयी म्हटले जात आहे की बॉक्स ऑफिसवर दुस-या चित्रपटासोबत क्लॅश होणार आहे. खूप विचार करून आणि डिस्ट्रिब्यूटर, ट्रेड ॲनालिस्ट आणि टॉप क्लासच्या रिसर्च टीमच्या सल्यावर निवड करण्यात आली आहे.
मीटूमध्ये दिग्दर्शक विकास बहलचे नाव आल्याने आता कंगनाने ‘मेंटल है क्या’ च्या प्रदर्शनाची तारीख २१ जून ऐवजी २६ जुलै केली आहे. त्यामुळे आता २६ जुलैला कंगनाचा मेंटल है क्या आणि ऋतिकचा सुपर ३० क्लॅश होणार आहे.