‘तू पाहतेस ती फक्त मुंबई पोलीसांमुळेच सुरक्षित आहे’ कंगनावर चाकणकर भडकल्या

Update: 2020-09-05 08:16 GMT

"महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही. मी मराठा आहे. काय उखडायचं ते उखडा" कंगनाच्या या ट्वीटवर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कंगानाची कान उघडणी केली आहे. तू उतरलेल्या विमानतळापासून ते तुझ्या घरापर्यंत जी मुंबई तू पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे." अशा शब्दात त्यांनी कंगनाला खडे बोल सुनावले आहेत.

हे ही वाचा...

कंगनाच्या मदतीला केंद्रीय महिला आयोग

दरवेळी एखाद्या महिलेलाच का टार्गेट केलं जातं?

पत्रकार स्वतःला इतर नागरिकांपेक्षा वेगळं स्टेटस असल्याचं का मानतात?

"महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, महाराष्ट्र त्यांचा आहे ज्यांनी मराठी गौरवाला प्रतिष्टीत केलं आणि मी गर्वाने सांगते, हो मी मराठा आहे. काय उखडायचं ते उखडा" अस ट्वीट कंगना राणावतने केलं होतं.

कंगनाच्या याच ट्वीटला प्रतिउत्तर म्हणून चाकणकर यांनी "मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण संस्कारहीन, कृतघ्न लोकांसाठी आम्ही वेळ वाया घालवत नाही. कंगणा राणावत तू उतरलेल्या विमानतळापासून ते तुझ्या घरापर्यंत जी मुंबई तू पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे." असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

 

 

Similar News