भाजप सरकारने २०१४ चीच पुनरावृत्ती करीत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवला आहे. या विजयाचा आनंद अनेक कलाकारांनीही साजरा केला. यामध्ये कंगनाने आगळ्या वेगळ्या पद्दतीने मोदींचा विजय साजरा केला. मोदींना नेहमीच पाठिंबा देणारी अभिनेत्री कंगना रणौतनं कुटुंबीयांसाठी भजी आणि चहाचा बेत आखून आपल्या कुटुंबीयांसोबत हा विजय साजरा केला. तिने हे फोटो ट्विटवर शेअर केले असून 'कंगना स्वत: जेवण बनवतेय हे पाहायला मिळणं म्हणजे दुर्मिळ असं तिने पोस्टमध्ये लिहलं आहे.
https://twitter.com/Rangoli_A/status/1131550159391748097