अमृता फडणवीस कंगनाच्या ‘त्या’ विधानाच्या समर्थनात?

Update: 2020-09-05 09:23 GMT

कंगनाच्या विधानाचा अनेकांनी निषेध केला. आमृता फडणवीस यांनी मात्र ट्विट करत कंगनाची पाठराखण केली आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या की 'आपल्याला एखाद्याचं म्हणणं पटू शकत नाही, पण लोकशाहीत व्यक्त होण्याचा आणि आपलं मत मांडण्यांचा अधिकार सर्वांना आहे. वाद-प्रतिवाद होत राहतील, पण पोस्टरला चप्पलांनी मारणं हे चुकीचे आहे,'

मिसेस फडणवीस यांच्या या ट्वीट मुळं त्या कंगनाच्या POK वाल्या वक्तव्याचं समर्थन करातायत का? असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान, कंगनाच्या POK वाल्या विधानाचा निषेध म्हणून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी कंगना राणावतच्या पुतळ्याला चप्पलांचा चोप देत आंदोलन केलं होतं. राज्यात काही ठिकाणी कंगनाचे पुतळे जाळून व पोस्टरवर काळ फासून निषेध व्यक्त केला.

Similar News