बॉलिवूडमध्ये येण्याआधी जूहीने जिकंला होता ‘हा’ किताब

Update: 2019-11-13 11:43 GMT

बॉलिवूडची नावाजलेली अभिनेत्री जूही चावला हीचा आज ५२वा जन्मदिवस आहे. हसऱ्या आणि बोलक्या स्वभावाने जूहीनं अनेक प्रेक्षकांना आपलसं केलं. तिच्या सुंदर अभिनयामुळे दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या वाढत गेली आणि ती अजूनही कायम आहे. सोज्वळ, सुंदर अभिनेत्रींच्या भूमिकेबरोबरच तिनं खलनायिकाही उत्तम प्रकारे साकारली.

१९८६ मध्ये चित्रपट 'सल्तनत'मधून जूहीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जुही चावलाने बॉलिवूड मध्ये येण्याआधी 'मिस इंडिया' हा खिताब जिंकला होता. एका खोडकर स्वभावाच्या मुलीची तिनं अनेकदा व्यक्तीरेखा साकारली. 'झुठ बोले कौवा’, 'हम हे राही प्यार के’, 'इश्क', 'येस बॉस', 'ड्युपलिकेट', ‘काटे', 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी', या चित्रपटातील जूहीच्या भूमिका सर्वांनाच आवडल्या.

जूहीला पहिल्या चित्रपटात फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर 'कयामत से कयामत तक' या चित्रपटानं जूहीचं नशीब पालटलं. या चित्रपटात आमिर खानसोबत मुख्य भूमीका साकारली होती. या चित्रपटामुळे जुही रातोरात स्टार झाली आणि अशा पद्धतीनं जुहीच्या बॉलिवूड करिअरला वेगाने सुरवात झाली.

Similar News