8 मार्चला महिला दिनानिमित्त खूप कार्यक्रम झाले, वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी केलेल्या, त्या करत असलेल्या कर्तुत्वाची दखल घेण्यात आली, त्यांचे कौतुक करण्यात आले, सर्व महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या, महिला सक्षमीकरणावर देखील खूप चर्चा झाली... पण आज 2-3 दिवसांनतर?
महिला सक्षमीकरण आणि त्यांचे शिक्षण, त्यांची नोकरी यांचा खूप जवळचा संबंध आहे, किंबहुना नोकरी करणारी, कमावती प्रत्येक महिला सक्षम आहे आणि तसे न करणारी महिला सक्षम नाही असा समज - गैरसमज ही अनेकांच्या, विशेष करून महिलांच्याच मनात असेल असं मला वाटत, किमान माझा तरी काही असा गैरसमज होता.
मी लग्नाच्या आधी नोकरी करायची पण लग्नानंतर मात्र उदयसोबत वेगवेगळ्या गावांना फिरत असल्यामुळे, बाळांतपणामुळे, मुल लहान असल्यामुळे, नोकरीची तितकीशी गरज नसल्यामुळे, थोडासा कंटाळा केल्यामुळे आणि हवी तशी नोकरी देखील न मिळाल्यामुळे लग्नानंतर मी नोकरी काही केली नाही. मी आनंदी होतेच, आणि आमच सगळ छानही चालल होत पण तरीही कधीकधी मला काहीतरी चुकल्यासारख, काहीतरी राहून गेल्यासारख वाटायच. मी नोकरी करत नाही, पैसे कमवत नाही म्हणजे मी काहीही करू शकत नाही, माझ्यात काहीतरी कमतरता आहे असंही मला कधीकधी वाटायचं... पण आज मात्र मला तसं वाटत नाही.
खरंतर आज माझी परिस्थिती खूप काही बदललेली आहे असं नाही. मी तीच आहे, तशीच आहे, पण तरीही माझा माझ्या स्वतःकडे, माझ्या आयुष्याकडे, माझ्या जवाबदाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र बदलला आहे. आणि त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी बदलल्या आहेत. अधिक चांगल्या झाल्या आहेत.
आता माझा हा दृष्टीकोन नक्की कसा बदलला ते मलाही माहित नाही. पण बहुतेक कधीतरी माझं मलाच लक्षात आल की मी नोकरी न करण हा आम्ही मिळून, एकमेकांना विश्वासात घेउन, आमच्या स्वतःच्या व कुटूंबाच्या उज्वल भविष्यासाठी घेतलेला निर्णय होता, आहे, आणि जरी मी नोकरी करत नसले तरीही माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळूनदेखील मी बरच काही करू शकते आणि त्यात काहीही चुकीच नाही व तस करण्यात कुठलाही कमीपणा नाही. आणि हे लक्षात आल्यावर मग मात्र खूप साऱ्या गोष्टी बदलल्या आहेत. अधिक चांगल्या झाल्या आहेत...
सदर लेख... आरती आमटे नानकर यांच्या फेसबूक वॉल वरुन घेतला असून ही त्यांच्या फेसबूक पोस्टची लिंक आहे.
https://www.facebook.com/100015214333807/posts/584130675437405/