दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात काल, रविवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचे पडसाद मुंबईसह देशभरात उमटले आहेत. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विद्यार्थी संघटनांनी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे निदर्शन करणाऱ्या या आंदोलकांना आज सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनंतर या आंदोलकांना आझाद मैदानात नेण्यात आले आहे. दरम्यान आंदोलन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नसल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याचे सांगण्यात येत आहे.