जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं अफेअर जेव्हा जगासमोर आलं तेव्हा काय झालं असेल. अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. त्यांच्या पत्नीचं नाव होतं मॅकेंजी. मॅकेंजी ला जेव्हा तिच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे. असं समजलं तेव्हा तिनं बेजोस ला घटस्फोट दिला. मात्र, या सगळ्यामध्ये जेफ बेजोस चं अफेअर कसं बाहेर आलं? याबाबत तुम्ही ऐकूण थक्क व्हाल.
अमेरिकी मॅगझीन नॅशनल एनक्वायररने गेल्या वर्षी जानेवारीत बेजोस आणि लॉरेन यांचे फोटोंसोबत त्यांच्या अफेयरचा खुलासा केला होता. तर दुसरीकडे बेजोस यांचा फोन सौदी अरबच्या एका राजपुत्राने हॅक केल्याचा संशय द गार्डियन ने व्यक्त केला आहे.
मात्र, जगातील हायप्रोफाईल व्यक्तीच्या फोनमधील डाटा कसा बाहेर आला? हा संशोधनाचा विषय आहे.