आगामी निवडणुका तोंडावर आल्या असून प्रचार सभेत राजकीय पुढाऱ्यांची भाषा महिलांच्या प्रती घसरताना दिसत आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी तर हद्दच केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर टीका करताना त्यांची जीभ चांगलीच घसरली.. ‘संविधान बदलणं नवरा बदलण्याइतकं सोपं नसल्याचं म्हणत कवाडे यांनी इराणी यांना लक्ष्य केलं. ते नागपूर येथे माजी खासदार व काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
काय म्हणाले जयदीप कवाडे?
‘स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करतात, मात्र संविधान बदलणे नवरा बदलण्याइतके सोपे नाही.’ कवाडे यांच्या या भाषणानंतर नाना पटोले यांनी कवाडेंना शाबासकी देत कौतुकही केले. जयदीप कवाडे यांच्या या बेजबाबदार वक्तव्यानंतर महिला राजकारण्यांबाबत असं आक्षेपार्य़ वक्तव्य कधी थांबतील असा सवाल उपस्थित होत असून महिलांकडे राजकारण्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन या वाक्यातून स्पष्ट होतो. तसंच अशा बेजबाबदार वक्तव्यामुळेच महिला राजकारणात फारशा येत नाहीत. त्यामुळे महिलांबाबत अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्यांच्या तोंडाला लगाम घालणं गरजेच असून अशा वक्तव्यानंतर ज्या पद्धतीने हास्यकल्लोळ होतो तो निश्चितच निषेधार्य आहे.
दरम्यान या प्रकरणी मॅक्सवुमनच्या टीमने भाजपच्या काही महिला लोकप्रतिनिधींशी बातचीत केली आहे. भाजपा प्रवक्त्या- शायना एनसी- संविधानाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तसेच कवाडेंचे हे वक्तव्य अतिशय निषेधार्य आहे महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन अतिशय खालच्या पातळीचा असून निंदनीय आहे.
https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/296741404561989/?t=4