स्थलांतरीत मजुरांना घरी पोहोचवण्यावरुन आता राज्य आणि केंद्र सरकारमधील वाद अधिकच वाढताना दिसत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी तडकाफडकी अतिरिक्त रेल्वे उपलब्ध करुन देण्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी निशाणा साधलाय.
हे ही वाचा...
- ’त्या’ व्हिडीओतील मोदी-योगींना अभद्र टीकेमुळे अलका लांबांवर गुन्हा दाखल
- ‘खाल्ल्या मिठाला तरी जागा’ रुपाली चाकणकरांचा योगींना आक्रमक टोला
- ‘४० पेक्षा अधिक ट्रेन रस्ता चुकल्या त्यावर रेल्वेमंत्री काहीच बोलले नाहीत?’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेला संबोधित करताना स्थलांतरीत प्रवासी मजुरांची बाजू मांडली. राज्याकडून ८० रेल्वे गाड्यांची मागणी केली जात असताना रेल्वे मंत्रालयाकडून ३० ते ४० गाड्या सोडल्या जात आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पीयुष गोयल यांनी सोशल मीडियावर आक्रमक पवित्रा घेताना महाराष्ट्रासाठी अचानक अतिरिक्त रेल्वे दिल्यानंतरही प्रवासीच नाहीत असं ट्वीट केलं आहे. यावर अंजली दमानिया यांनी ‘पीयूष गोयलजी, हा विनोद आहे की, तुम्ही अपरिपक्व आहात’ असा टोला लगावला आहे.
अंजली दमानिया यांनी म्हटलंय की, “८ रेल्वे गाड्या सोडल्या जात असताना अचानक तुम्ही ४१ रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा केली, त्यानंतर दहा रेल्वे गाड्या रद्दही करण्यात आल्या. हजारो मजुरांनी रांगेत उभं राहावं, अशी तुमची अपेक्षा आहे का? पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, बीएमसी कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्था यांच्यासह आम्ही पहाटे साडेचार वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर धडपड करत होतो. ना अन्न होतं, ना पाणी”.