जेव्हा दोन मित्र एकाच रस्त्याने करियर ची सुरुवात करतात, एखाद्याला पटकन यश मिळते तर दुसऱ्याला बराच स्ट्रगल करावा लागतो. आयुष्याच्या एखाद्या वळणावर जेव्हा हे दोघे एकमेकांना भेटतात, तेव्हा त्यांच्या शाब्दिक चकमकींना सुरुवात होते. मात्र इथे या मित्रांनी एक वेगळीच मजा घेतली आहे.
देशातील प्रसिद्ध आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या विश्वास नांगरे-पाटील शिस्तप्रिय आणि कायद्याच्या चौकटीत राहणारे नाशिकचे पोलिस आयुक्त अशी त्यांची ओळख . मात्र आता ते एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. विश्वास नांगरे-पाटील यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विश्वास नांगरे-पाटील हे हाऊसफुल - ४ सिनेमातील बाला या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
https://youtu.be/07vcWobui_M