मर्दानगीच्यासंकल्पनाआपण कशा बदलायला पाहीजेत यावर आपण नुसता विचार करून नाही तर प्रत्यक्ष प्रयत्न केले तर नक्कीच सकारात्मक बदल होतात हे बदल वर्तनातुन दिसायला हवेत.स्त्री घरात असो की असो बाहेर असो घरातील पुरुष मग तो भाऊ,बाप,नवरा कोणीही असो घरातील अशा स्त्रीयांना कपभर चहा करून देणे,ग्लासभर पाणी देणे, केस विंचरून बघा,अंघोळीला बसल्यावर तिची पाठ घासुन द्या,अंघोळ झाल्यास आपण नेहमी टाँवेल वापरतोच पण; आईच्या पदराने जरा तोंड पुसुन बघा तिला किती बरं वाटत़ं!घरात गरोदर स्त्री असेल तर तिचे नखं जास्त वाढत असतात ते काढण्यासाठी मदत केली तर तिला किती बरं वाटतं म्हणून सांगु!
बाळंतीण होण्यासाठी जेव्हा स्त्री लेबर रुममध्ये असते तेव्हा नवर्यांची घालमाल त्या स्त्रीला ही दिसते,समजते ती जाणत असते त्याचं माणुसपण पण स्त्रीचं दुःख बघुन ज्याला दुःख होते जो रडतो जो तिचं दुःख कमी करण्यासाठी खर्या अर्थाने तिच्या सोबत,पाठीशी उभा रहातो तिथे आणि तो खर्या अर्थाने "मर्द".......आता बरेच जण म्हणु शकतील की आम्ही हे करतो ते करतो.
हो माहीत आहे आम्हाला की "दार लाऊन" कार्यक्रम असतात असे! बंद दाराच्या आत किंवा शिकलो म्हणुन,मजबुरी म्हणुन कायदे आले म्हणुन नाही तर "मनातुन"करणं गरजेचं आहे. आम्ही मान्य करतो की,खुप सार्या पुरुषांनी सरेआम खुल्यामनाने स्त्रीयांचा माणुसपणा जपला आहे स्त्रीवादी भुमिका घेत खुप सारे प्रयत्न केले आहेत.
त्याच्या या भुमिकेमुळे तर आम्ही ईथे लिहु बोलु शकतो पण खुप सारे ढोंगी पांखडी असतात ज्यांची स्त्रियांच्या बाजुची भुमिका असते पण ते ती प्रत्यक्षात #भुमिका घेत नाहीत.बाकी असं वाटतं मला तुम्हाला पटेलच असं नाही कारण पिढ्यानपिढ्या सगळं ऐतं मिळत आलयं ते तुम्ही सहज त्यागणं कठीण आहे यामुळे तुम्ही नाही बदलले तर शेवटी आम्ही बदलणारच आहोत स्वतःला ...खु सार्या पुरुषांनी सरेआम खुल्यामनाने स्त्रीयांचा माणुसपणा जपला आहे स्त्रीवादी भुमिका घेत.
-सत्यभामा