'स्त्री चा सन्मान करा’ आंतरराष्ट्रीय बालिकादिनी 'यांच' आवाहन

Update: 2019-10-11 15:01 GMT

आज आंतरराष्ट्रीय बालिकादिन (International girl child day) संपुर्ण जगभरात साजरा केला जात आहे. यानिमीत्ताने आज लैंगिक विषमता, स्त्री अत्याचार, स्त्रीभृण हत्या यांसारख्या स्त्री विषयक गंभीर समस्यांबाबत विश्वभर जनजागृती केली जाते. स्त्रियांना समान हक्क आणि यथोचित सन्मान मिळवुन देण्यासाठी, ११ ऑक्टोबर २०१२ पासुन ‘संयुक्त राष्ट्रसंघ’ द्वारा (UNICEF) संपुर्ण विश्वभर आंतरराष्ट्रीय बालिकादिन दरवर्षी साजरा करण्यात येतो.

या निमित्ताने अहमदनगर मधील धोपावकर बंधु-भगिनी आणि परिवार सर्व महिलांना अत्यंत जबाबदारीपूर्ण शुभंकामनांसह अत्यंत विनम्रतापूर्वक जागरूक होण्याचं आवाहन करत आहेत.

'स्त्री भ्रूण हत्या तत्काळ थांबवा आणि मानव वंश वाचवा.'

ह्या विश्वातील समस्त पुरुषांनो वेळीच भानावर या

'स्त्री' चा सन्मान करा. स्त्री भ्रूण हत्या करू नका,

स्त्री अत्याचार होवू देवू नका, कोणालाही करू देवू नका.

कारण स्त्री जर जन्मालाच आली नाही. तर, आपला मानव वंश टिकेल कसा?

तुमचा वारस कोणाच्या पोटी जन्माला येईल?

अत्यंत गांभीर्याने विचार करा

घराचे घरपण टिकवायला पोटी एक लेक हवी,

गुलाबाच्या ताटव्या जवळ नाजुकशी शेवंती हवी,

रानांत जसा पिंपळ तशी अंगणी तुळस हवी,

गावात असला पाणवठा तरी मागील दारी विहीर हवी,

पडल झडल सावरायला, जखमे वर फुंकर घालायला,

मनीच हितगुज सांगायला पोटी एक लेक हवीच हवी...''

Similar News