सध्या निवडणुकांचे वातावरण चांगलेच रंगू लागले आहे. प्रत्येक पक्षांच्या सभाही जोर धरु लागल्या आहे. अहमदनगर लोकसभेसाठी भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील उतरले असून त्यांच्या प्रचारसभेला महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवार कुटुंबाच्या मुद्यावरुन आरोप करतात मात्र पवार यांनीच राज्यात अनेकांची कुटुंब फोडण्याचे उद्योग केले आहेत, मोदी यांना पवारांसारखे मुलगी, पुतण्या यांना नाहीतर सर्वसामान्यांना उमेदवारी द्यायची आहे, त्यामुळे निवडणुकीत नात्यागोत्याला थारा देऊ नका, नाते प्रत्येकालाच असते, मलाही भाऊ आहे, तो मला संपवायला निघाला आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांची विचारधारा जपणारा कधीच संपत नसतो, मी जर मुंडे यांच्या विचारापासून दूर गेले तर जनता मला थारा देणार नाही. आपला भाऊ कधीकधी मी गोपीनाथ मुंडे यांच्या मुळेच आहे, असे सांगतो, तर कधी मुंडे यांनी मला मोठे होऊ दिले नाही असेही म्हणतो. त्याला नेमके काय म्हणायचे हे एकदा त्याने ठरवून घ्यायला हवे. वारसा केवळ मुलगाच चालवतो असे काही नसते. मुलीसुद्धा सक्षमपणे वारसा चालवतात, असेही त्या म्हणाल्या.