सम-विषम तारखेच्या वादात सापडलेल्या इंदोरीकर महाराज यांनी आज एक पत्रक प्रसिद्ध करून दिलगिरी व्यक्त केली आहे. सोबतच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचंही म्हटलंय. एक पत्रक प्रसिद्ध करून इंदोरीकर (Indurikar Maharaj) महाराजांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
संबंधित बातमी...
सोंगाड्या इंदुरीकर आणि विखारी उत्पात
पत्रकात इंदोरीकर महाराज म्हणतात की, "महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, किर्तनकार, शिक्षक, शिक्षीका, डॉक्टर, वकील आणि माता समान असलेल्या तमाम महीला वर्ग गेल्या ८ दिवसांपासून सोशल मिडीया आणि प्रसारमाध्यमांमध्ये माझ्या वाक्याचा विपर्यास केला जात आहे.
मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून मी माझ्या २६ वर्षांच्या सेवेत समाजप्रबोधन, समाज संघटन, अंधश्रध्दा निर्मुलन, विविध जाचक रूढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या किर्तनातील वाक्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलंय."