तिच्या बोटांत जादू आहे बघा कशी झटक्यात विकेट काढली.

India's Shikha Pandey Delivers 'Ball of The Century',;

Update: 2021-10-11 09:13 GMT

महिला टी २० मालिकेतील दुसऱ्या टी- 20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. परवा झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. हा सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीचा झाला. पण अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. भारतीय संघाने हा सामना जरी गमावला असला तरी सद्या क्रिकेट विश्वात एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणचे शिका पांडे हिने टाकलेल्या इन स्विंग चेंडूची.

शिखा पांडे यांनी ऑस्ट्रेलियाच्या एलीसा हिली यांना अप्रतिम असा एक स्विंग चेंडू टाकून क्लीन बोल्ड केले.



 तिने टाकलेला चेंडू ऑफ साइडवरून थेट स्टॅम्पला जाऊन लागला. त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली यांना काही क्षण पाहतच रहावं लागलं.




 तिने टाकलेल्या या चेंडूचे सर्वजण आता खूप कौतुक करत आहेत. त्या सामन्यात निवेदन करणाऱ्या निवेदकांनी तर या चेंडूला 'बॉल ऑफ द सेंच्युरी ' म्हणत कौतुक केले.





 


 


Tags:    

Similar News