वरुण धवन म्हणतोय ‘या’ आहेत खऱ्या ‘कुली नं. १’

Update: 2020-03-05 06:58 GMT

“सामर्थ्यवान स्त्रियांना आमचा सलाम!

आंतरराष्ट्रीय महिला दिवस अवघ्या काही दिवसावर आलाय. यानिमित्ताने रेल्वे मंत्रालय त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना प्रोस्ताहीत करण्यासाठी काही खास ट्वीट पोस्ट करीत आहे. त्यांचे सध्याचे ट्वीट म्हणजे भारतातील विविध रेल्वे स्थानकांवर काम करणाऱ्या महिला हमाल कामगारांना मानवंदना आहे. इतकेच काय, त्यांच्या ट्विटला अभिनेता वरुण धवन शिवाय इतर कलाकारांची जोरदार साथ मिळाली आहे. ट्विटमध्ये रेल्वे मंत्रालयाने तीन महिलांचे चित्र शेअर केले आहे.

काय आहे ट्विट

“भारतीय रेल्वेसाठी काम करताना या लेडी कूलींनी हे सिद्ध केले की त्या दुसऱ्या क्रमांकावर नाही. आम्ही त्यांना अभिवादन करतो, ”असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अभिनेता वरुण धवन देखील या ट्विटवर आपली प्रतिक्रिया देत महिलांना 'कुली नं. १' असं म्हटलं आहे. वरुणच्या आगामी कुली नं. १ चित्रपटाचं प्रमोशनही त्याने लगे हाथ करुन घेतलं.

“रेल्वेमध्ये वेगवेगळ्या कामांची जबाबदारी साभाळत असलेल्या महिला कर्मचारी रेल्वेचं संचलन, स्थानकांची देखभाल करण्यासह रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेची खात्री करत आहेत. रेल्वेच्या सर्व महिला कर्मचारी आमच्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणेचं स्त्रोत आहेत.”

 

Similar News