भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना न खेळताच अंतिम फेरीत प्रवेश

Update: 2020-03-06 08:10 GMT

भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत न खेळता अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्याने एकही चेंडू न खेळताच भारतीय महिला संघ अंतिम फेरीत पोहोचलाय. ५ मार्च रोजी भारत आणि इंग्लंड दरम्यान सिडनी मध्ये उपांत्य फेरीचा सामना खेळवण्यात येणार होता. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला आणि याचा फायदा भारतीय संघाला मिळाला.

आयसीसीच्या नियमानुसार, सामना रद्द झाल्यास गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळतो. भारतीय संघ महिला विश्वचषक स्पर्धेच्य़ा आंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. दरम्यान, साखळी फेरीत भारताने 4 सामने जिंकत 8 गुण मिळवले होते. तर इंग्लंडने 3 सामने जिंकून 6 गुण मिळवले होते.

 

Similar News