पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळात सहा महिला खासदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलीय, पहिल्या टर्ममध्ये ९ महिला खासदारांना मंत्रिपदं देण्यात आली होती.
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सहा महिलांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलीय. यामध्ये तीन कॅबिनेट तर तीन राज्यमंत्री आहेत. त्यामध्ये निर्मला सीतारमण (अर्थ मंत्रालय आणि कार्पोरेट व्यवहार), स्मृती इराणी (महिला बालकल्याण मंत्रालय आणि कापडउद्योग), हरसिमरत कौर बादल (अन्न प्रक्रिया उद्योग) साध्वी निरंजन ज्योती (ग्रामीण विकास) राज्यमंत्री, रेणुका सिंह सरुता (आदिवासी राज्यमंत्री), देबाश्री चौधरी (महिला बालकल्याण राज्यमंत्री) या महिला मंत्र्यांचा 2019 च्या मंत्रीपदा मध्ये समावेश आहे.
मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात ९ महिलांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. यामध्ये नजमा हेपतुल्ला, सुषमा स्वराज, उमाभारती, अनुप्रिया पटेल, मनेका गांधी, कृष्णाराज, निर्मला सीतारमण, स्मृती इराणी आणि हरसिमरन कौर – बादल या महिला खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश होता.